You are currently viewing भूमीची होशील राणी

भूमीची होशील राणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भूमीची होशील राणी*

 

तुझ माझ आभाळ

गळत तुझ्या डोळी

किती पाहशील वाट

भिजे चंद्रकळा काळी….1

नको रस्त्यात विचारू

कुठे विसावतो *पती*

सैनिक माझा पेशा

झोपतो मध्य *राती*…..2

नाही गाळायचे अश्रू

सीमेवर मला कळेल

नेम चुकता शस्त्राचा

शत्रू पटकन *पळेल*…..3

पाडतो गोळ्यांचा पाऊस

आठवण येते तुझी

तुडवून गोड *ऊस*

*राणी केली माझी*……4

गळलं जरी टीपूस

ऐकू येत रणांगणी

नको जागत बसू

झोपायचे गाऊन गाणी…..5

शेतकऱ्याची तू लेक

पाजायच शेता पाणी

काळजी गाडून शेतात

भूमीची होशील राणी…..6

 

विनायक जोशी 🖋️ठाणै

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा