माजी सैनिक व्याख्येत न येणारे सैनिकांची व विधवांची माहिती सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील ज्या सैनिकांनी अल्पशा कालावधीत सैन्यात सेवा केली आहे. आजपर्यंत माजी सैनिक व्याख्येत न येणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या ६५ वर्षे वयावरील सैनिकांचा तपशिल दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मागविलेला आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र सैनिक व विधवांनी आपली माहिती दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेटून सादर करावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
तथापि वयोमानामुळे कार्यालयात येणे शक्य नसल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा ई-मेल आयडी zswo_sindhudurg@maharashtra.gov.in वर किंवा मोबाईल क्रमांक ८२१९२८५७८८, ७०२८३१८४०७ वर व्हॉट्सअपद्वारे पुढीलप्रमाणे, आर्मी नंबर, रँक व संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, रेजिमेंट, रेकॉर्ड ऑफिस, भरतीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख, निवृत्तीचे कारण, चारित्र्य आणि युद्धात सहभाग असल्यास तपशील नमूद करणे आवश्यक माहिती सादर करावी.
यासाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे आहेत :
सैन्यसेवा केलेली परंतु माजी सैनिक व्याख्येत न बसणारी ६५ वर्षांवरील व्यक्ती (विधवांसाठी वयाची अट नाही), सैन्यसेवेतून बडतर्फ (Dismiss) किंवा भगौडा (Deserter) झालेला नसावा, KSB/ZSB कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत (Penury Grant) मिळण्यास पात्र नसलेला, अर्धसैनिक बल (Para Military Force) मधील नसावा, Territorial Army मध्ये सेवा केलेले सैनिकांचा समावेश करावा, तसेच चरितार्थासाठी उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या व्यक्तींचाच समावेश करावा, सद्यस्थितीत पेन्शन मिळणारे, दुसरे महायुद्ध लाभार्थी तसेच KSB/ZSB कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत (Penury Grant) मिळणारे लाभार्थी यांनी वरील माहिती सादर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
