You are currently viewing खानोलकर वाचनालय आयोजित दत्ताराम सडेकर पुरस्कृत निबंध लेखन स्पर्धेत तेजस्वी शैलेंद्र सगम प्रथम

खानोलकर वाचनालय आयोजित दत्ताराम सडेकर पुरस्कृत निबंध लेखन स्पर्धेत तेजस्वी शैलेंद्र सगम प्रथम

सावंतवाडी / मळगाव:

कै.प्रा.उदय खानोलकर वाचनालय मळगाव आयोजित श्री.दत्ताराम सडेकर पुरस्कृत निबंध लेखन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, प्रमुख अतिथी दत्ताराम सडेकर, सौ. सुहासिनी सडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख अतिथी दत्ताराम सडेकर म्हणाले, मुलांनी आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या गुरुजनांप्रती आदर राखावा, त्यांचा सन्मान करावा असा मोलाचा उपदेश केला.

श्री दत्ताराम सडेकर पुरस्कृत निबंध लेखन स्पर्धेत तेजस्वी शैलेंद्र सगम (आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. वेदांती सत्यवान नवार (वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला) हिने द्वितीय तर स्वराली गजानन गवस (मळगाव इंग्लिश स्कूल) हिने तृतीय क्रमांक मिळवला. योगिता विलास राऊळ (आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी) आणि वैभवी गोविंद परब (मळगाव इंग्लिश स्कूल) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण श्री.किशोर अरविंद वालावलकर व श्री विलास राजाराम चव्हाण सावंतवाडी यांनी केलं.

सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कै.प्राचार्य रमेश कासकर स्मृती कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास संचालक हेमंत खानोलकर, चंद्रकांत जाधव, शांताराम गवंडे, माजी संचालक बाळकृष्ण मुळीक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा