You are currently viewing फोंडाघाट जि.प. मतदारसंघातून अनंत पिळणकर यांचा अर्ज वैध
Oplus_16908288

फोंडाघाट जि.प. मतदारसंघातून अनंत पिळणकर यांचा अर्ज वैध

 महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग

कणकवली :

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अनंत गंगाराम पिळणकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज आज झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत वैध ठरला आहे.

यासोबतच फोंडाघाट पंचायत समितीसाठी उबाठा गटाचे चैतन्य सावंत व साईनाथ भोवड तसेच लोरे पंचायत समितीसाठी उबाठाच्या किर्ती एकावडे यांचे उमेदवारी अर्जही वैध ठरले आहेत.

अर्ज वैध ठरल्यामुळे आजपासून महाविकास आघाडीच्या प्रचारास कोणतीही अडचण राहिलेली नाही. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्यापासून अधिकृत प्रचाराचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा