*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*माघी गणपती*
माघ मासात शुक्ल पक्षात येणार्या चतुर्थीला गणेश जयंती असते. याचे एक वेगळेच महत्त्व आहे. पौराणिक मान्यतानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे माघ महिना जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येतो. महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहे म्हणून कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्याआधी गणपतीची आराधना केली जाते.
तिलकुंद चतुर्थीला गणपतीचा प्रभाव एक हजार पट अधिक कार्यरत असतो असं म्हणतात.. गणपतीचे स्पंदन आणि चतुर्थीला धरतीचे स्पंदन समान असल्यामुळे धरती व गणपती एकमेकांसाठी अनुकूल मानले गेले आहे असे सांगितले जाते..
अग्निपुराणामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे विधान सांगितले गेले आहे. गणेश जयंतीला अनेक लोकं हळद किंवा शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा करतात. तिळाने तयार पदार्थ गणपतीला अर्पित करतात म्हणून याला तिलकुंद चतुर्थी असे ही म्हटले जातं.
माघी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
