*मोफत महाआरोग्य शिबिराचे संपन्न -कोकण संस्था व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांचे आयोजन*
सावंतवाडी
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक २०/०१/२०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये किशोरवयीन मुली, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये हदयविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, नेत्ररोग, जनरल फिजिशियन, युरोलॉजी, नाक-कान-घसा अशा अनेक आजाराचे निदान व मोफत शस्त्रक्रिया नोंदणी करण्यात आली. या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांचे आरोग्य सुधारणे, आजारांचे वेळेवर निदान करणे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवणे हे होते. या आरोग्य शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली असून तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना त्यांच्या आजारानुसार योग्य ते मार्गदर्शन, सल्ले आणि उपचार दिले.
या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग चे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, तसेच सदस्य शारदिनी बागवे, रूपा मुद्राळे, हेलन निब्रे, लक्ष्मण कदम, शेखर सुभेदार, रवी जाधव या सर्व प्रमुख मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. गिरीश चौगुले, डॉ. धीरज सावंत, डॉ. निखिल अवधूत, तसेच परिसेविका प्राची राणे मॅडम, वैष्णवी गोसावी, उज्ज्वला रांजणकर, हेमांगी रणदिवे, मानसी गावडे, वैष्णवी सावंत, शिल्पा पेडणेकर, सुषमा भाईप, सुखिया बागवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच भ.क. ल. वालावलकर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज, डेरवण येथील तज्ञ डॉक्टरांनी या आरोग्य शिबिरात सेवा दिली. यामध्ये डॉ. धनंजय धोनवारे (सर्जन), डॉ. राजा चरण (जनरल फिजिशियन), डॉ. संकेत खरात (अस्थिरोग तज्ञ), डॉ. निलेश येडे (नाक-कान-घसा तज्ञ), डॉ. मनीष चौरसिया (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. उत्तरेश्वर (नेत्ररोग तज्ञ), वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सूरज पवार तसेच इतर मेडिकल स्टाफ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सतीश बागवे यांनी सर्व सहकाऱ्यांचे व नागरिकांचे आभार मानत, भविष्यात ग्रामीण व दुर्गम भागातही अशी आरोग्य शिबिरे सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत व तालुका समन्वयक समीर शिर्के, हनुमंत गवस, गौरी आडेलकर, अवंती धुरी, रुचा पेडणेकर, वैष्णवी म्हाडगुत, तन्वी केसरकर, शुभम लोणग्रे यांनी नियोजन व अंमलबजावणीत विशेष योगदान लाभले.
