You are currently viewing कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी निश्चित
Oplus_16908288

कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी निश्चित

जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटप; बुधवारी अर्ज दाखल होणार

 

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे शिवसेनेकडील उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

यामध्ये आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ. दीपलक्ष्मी पडते, वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून नागेश आईर, पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून दादा साईल, घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून दीपक नारकर, नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून संजय पडते तर माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून साठी रुपेश कानडे यांची नावे निश्चित झाली आहेत.

पंचायत समिती उमेदवारांमध्ये माणगाव पंचायत समितीसाठी कौशल जोशी, गोठोस पंचायत समितीसाठी दिव्यानी खरत, वेताळबांबर्डे पंचायत समितीसाठी अश्विनी सावंत, डिगस पंचायत समितीसाठी निखिल कांदळगावकर, जांभवडे पंचायत समितीसाठी बाळू मडव, कसाल पंचायत समितीसाठी बापू पाताडे, नेरूर पंचायत समितीसाठी निता नाईक, पाट पंचायत समितीसाठी प्रियांका जळवी व सालगाव पंचायत समितीसाठी मिलिंद नाईक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

सर्व निश्चित उमेदवार उद्या, बुधवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या घोषणेमुळे कुडाळ तालुक्यातील निवडणूक रणधुमाळीला अधिक वेग आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा