*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*मकरसंक्रांत– हळदीकुंकू*
भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिला संक्रांती निमित्त हळदीकुंकू समारंभ आयोजित करतात..
मकरसंक्रांतीला हळदीकुंकू करण्याचे आणि तेव्हा देण्यात येणार्या वाणाचे महत्त्व असे की मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ..
मकरसंक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात
रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ
पोषक असतो. अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे हे जिवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदीकुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो.
आध्यात्मिक महत्व—
सुवासिनी च्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीची हळद कुंकू लावून पूजा केली जाते. याप्रकारे ब्रह्मांडातील आदिशक्तीच्या सुप्त लहरींना जागृत होण्यासाठी आवाहन केले जाते आणि एकमेकांमधील देवत्वाची पूजा केली जाते.
हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्या जिवासाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी कुंकवाच्या माध्यमातून एक प्रकारे दुसर्या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच आपण करत असतो.
हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यासही साहाय्य होते…
सुवासिनी स्त्रिया ह्या दिवशी हळदी कुंकू देण्याघेण्याच्या उद्देशाने एकत्र जमतात त्यामुळे जातीधर्मातील मतभेद दूर करण्याचा अप्रत्यक्षरित्याही संदेश यातून दिला जातो.
आजच्या आधुनिक यंत्रयुगात संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा कालबाह्य गोष्टी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आज आपण जे सण साजरे करतो ते हौस म्हणून करतो की त्यामागील धार्मिक हेतू जाणून करतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचे आणि त्यांचा यामागचा काय हेतू किंवा उद्देश काय तर….
केवळ धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी-कुंकू नाही तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापनकौशल्य, कलाकुसर, तसेच वैचारिक–बौद्धिक देवाणघेवाण होते.. एकमेकांना भेटता येते .. उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता, कविवृत्ती जागृत होते व हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो.
हलवा बनवताना जसे तीळ आणि गूळ एकत्र होऊन जातात तसेच दोन स्त्रियांनी एकरूप होऊन नेहमी राहावे असा संदेश ही या निमित्ताने दिला जातो… एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी व हा ठेवा जपून ठेवण्यासाठी ,समाजाचं आपण देणं लागतो.त्यातील संस्कृतीही आपण जपायलाच हवी आणि हळदी-कुंकू हे त्याचेच निमित्त आहे. नाही का…!
जुन्या-नव्या विचारांना उजाळा मिळतो
स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरतंय याचा विचार एकत्र आल्यामुळे होऊ शकतो.
हळदी-कुंकवानिमित्ताने हा सवाष्णींचा सण.. विधवा वा सौभाग्यवती यात भेद होतो. तेव्हा अशा कार्यक्रमाला हळदी-कुंकू हे नाव न ठेवता ‘तिळगुळाचा कार्यक्रम’ असा ठेवावा म्हणजे स्त्रियांमधील भेदही कमी होतील असा एक नवा विचार या हळदी कुंकू या निमित्ताने करता येईल
या निमित्ताने वाणाच्या रूपात थोडी तरी संस्कृतीची जपणूक झाल्याचा आनंद मिळतो.
आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश ठेवला. यातून भेटीगाठी होतात, प्रेमाची व विचारांची देवाणघेवाण, चालीरीतींना उजाळा मिळतो. इतरांच्या पाहून चार गोष्टी शिकायला मिळतात…
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
