You are currently viewing जि. प. व पं. स निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निश्चित
Oplus_16908288

जि. प. व पं. स निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार निश्चित

उद्या करणार अर्ज दाखल

 

वैभववाडी :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आले असून हे सर्व उमेदवार बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्योजक सुनील सदानंद नारकर, तर कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी सभापती शुभांगी उर्फ माई सरवणकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातून गेल्या वेळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या दिव्या दीपक पाचपुडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पंचायत समिती निवडणुकीसाठी मुंबईवाडा पंचायत समितीतून तिरवडे सरपंच जितेंद्र तळेकर, कोळपे पंचायत समितीतून रिहाना काझी, उंबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी सरपंच स्मिता संतोष पाटील यांची नावे निश्चित झाली आहेत.

दरम्यान, कोकिसरे मतदारसंघ हा मित्र पक्षीय असल्याने मनसेसाठी हा मतदारसंघ सोडण्यात आला असून, येथे मनसेचा उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. मात्र उशिरापर्यंत त्या उमेदवाराचे नाव समजू शकले नाही.

तसेच लोरे पंचायत समितीतून माजी सभापती लक्ष्मण रावराणे तर खांबळे पंचायत समितीतून स्वप्नील रावराणे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार बुधवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा