You are currently viewing पैलतीर…!

पैलतीर…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पैलतीर…!*

 

 

ऐलतीर पैलतीर

जीवनाचे टप्पे दोन

भोवती कोंदण

कर्माचे…

 

कधी ऐलतीरावर

मखमली वाटेने चालणं

कधी पांदण

काटेरी…

 

संकटांची वादळे

मध्येच जीवाला छेडती

कवडसे पडती

आशेचेही…

 

जीवनाच्या वाटेवर

कधी सागर उधाणलेला

खुलूनी खेळलेला

वार्‍यासम…

 

संवाद हळवांतले

ऐलतीरावर असे थरारती

बिंबे ढळती

पैलतीरी…

 

पैलतीर गाठताना

डोळ्यांच्या किनारी पाणी

सुरू कहाणी

पुनश्च….!

 

तिथे तटावर

ओढीने उसळती लाटा

उजळत वाटा

दशदिशा…

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा