You are currently viewing भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘डॅझेलिया 2026’ उत्साहात : पॉलिटेक्निक विभागाने मिळवली जनरल चॅम्पियनशिप….*

भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘डॅझेलिया 2026’ उत्साहात : पॉलिटेक्निक विभागाने मिळवली जनरल चॅम्पियनशिप….*

_*भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘डॅझेलिया 2026’ उत्साहात : पॉलिटेक्निक विभागाने मिळवली जनरल चॅम्पियनशिप….*_

_*अथर्व काणे व सानिया वाईरकर ठरले पहिल्या मिस्टर अँड मिस बीकेसी किताबाचे मानकरी….*_

सावंतवाडी

_भोसले नॉलेज सिटीचे बहुप्रतीक्षित वार्षिक स्नेहसंमेलन ‘डॅझेलिया 2026’ काल अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयांचा एकत्रित सहभाग असलेले हे स्नेहसंमेलन प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी तसेच यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल या संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते._

_कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल (नि)रत्नेश सिन्हा, वायबीआयटी प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, वायबीसीपी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे व वायबीआयएस मुख्याध्यापिका प्रियंका देसाई उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी अच्युत भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भोसले नॉलेज सिटी सदैव कटिबद्ध असून सांघिक भावना वाढीस लागावी यासाठी सर्व संस्थांनी मिळून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले._

_गेले पंधरा दिवस संस्थेमध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील अंतिम विजेत्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये बीकेसी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक विभागाने तर बीकेसी कल्चरल चॅम्पियनशिप फार्मसी कॉलेजने पटकावली. सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या पहिल्या बीकेसी जनरल चॅम्पियनशिपवर यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकने नाव कोरले. तसेच पहिल्यांदाच आयोजित मिस्टर अँड मिस बीकेसी स्पर्धेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी अथर्व काणे मिस्टर बीकेसी तर त्याच कॉलेजची सानिया वाईरकर मिस बीकेसी किताबाची मानकरी ठरली._

_या भव्य सोहळ्यास सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कॅम्पसमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे परिसराला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आकर्षक ध्वनी व प्रकाश योजनांच्या साथीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर उत्साहाने भारावून गेला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले. त्यांना बोनी शेरॉव्ह यांनी साथ दिली. ‘डॅझेलिया 2026’ हे वार्षिक स्नेहसंमेलन भोसले नॉलेज सिटीच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रम ठरल्याची भावना उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली._

प्रतिक्रिया व्यक्त करा