*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मिळवून देईल तुजला कीर्ती*
लावून बोटाला काल शाई
आज जिंकलीस तू लढाई
शाई पुसायचे नाही कारण
पाच वर्षांची हीच *कमाई*
1
आनंद सांगतो चेहे-यावरचा
बसणार “तूच” महापौरपदी
दुसरा नाही सक्षम उमेदवार
सांभाळणारा काटेरी गादी
2
हुकमी असून *संख्याबळ*
नाही कुठला “अंतरविरोध”
प्रतिकाराचा तर पश्न कुठे
येशील निवडून बिनविरोध
3
जिंकत आलीस किती लढाया
पाठीला नाही लागली माती
आकड्यांची ही मॅजिक फिगर
मिळवुन देईल तुजला कीर्ती
4
आयुष्यातील महत्वाची लढाई
जिंकल्यावर आम्हा नको विसरू
करताना तू *अधिकार ग्रहण*
आम्ही छोटीशी *कविता करू*
5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वननी/9324324157
