*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालकविता*
*बाबांचा स्वयंपाक* (गंमत गाणं)
—————————-
आईला यायला
उशीर झाला
तेव्हा बाबांनी
स्वयंपाक केला
यूट्यूब चा
करून वापर
वरण भाताचा
लावला कुकर
सकाळच्या पोळ्या
केल्या गरम
शेकून साऱ्या
झाल्या नरम
भाजी बिजीला
मारली गोळी
त्या ऐवजी
तूप पोळी
वरण भात
कैरीचे लोणचे
गुळांबा वाढला
दोन चमचे
खमंग पापड
भाजले दोन
तेव्हढ्यात वाजला
आईचा फोन
लवकर येतेय
ऐका जरा
पसारा थोडा
कमी करा
श्रीनिवास गडकरी.
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
13.01.2026
