कणकवली :
कणकवली तालुक्यातील फोंडाघाट मधील बावीचे भाटले परिसरात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यात काहींच्या डोक्याला मार लागला आहे. सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फोंडाघाट बावीचे भाटले येथील पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीच्या वाद होता आणि याच वादातून दोन्ही कुटुंबामध्ये हाणामारी झाली. या दोन्ही कुटुंबाकडून लाकडी दांडा व इतर साहित्य जे हाणामारी करण्यासाठी वापरण्यात आले ते जप्त करण्यात आले. असून याप्रकरणी कणकवली पोलिस स्थानकात दोन्ही कुटुंबाने मारहाण केल्यानंतर धाव घेतली, मात्र पोलिसांनी सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.