प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षचे 26 एप्रिल रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.७ वी) २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी आवेदन पत्र ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहे. शाळा माहिती प्रपत्र, नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक ३० डिसेंबर २०२५ ते २ फेब्रुवारी २०२६ असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक ३ ते १७ फेब्रुवारी २०२६ असा आहे. शाळा महिती प्रपत्र, अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनाक १८ ते २३ फेबुवारी २०२६ असा आहे. शाळा माहिती प्रपत्र, अति विशेष विलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचा कालावधी दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा आहे. २८ फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
परीक्षेचे वेळापत्रक, स्वरुप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम, परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत तसेच इतर सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे वेळीच भरण्यात यावीत.
