तिराळी घाटात थरारक अपघात
तामीळनाडूहून गोव्याकडे जाणारा ट्रॅव्हलर उलटला
दोडामार्ग
तिराळी घाट परिसरात टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तामीळनाडू येथून गोव्याच्या दिशेने पर्यटनासाठी निघालेला टेम्पो ट्रॅव्हलर अवघड वळणाचा अंदाज न आल्याने अपघातग्रस्त झाला, अशी माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.
या अपघातात ट्रॅव्हलरमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता असून, जखमींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने मदतकार्य सुरू केले.
तिराळी घाटातील तीव्र वळणं आणि उतारामुळे या मार्गावर वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झालं आहे. अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
