You are currently viewing *साळगाव महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

*साळगाव महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

*साळगाव महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन..*

कुडाळ

परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगांव येथे गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयीन क्रीडा विभागाच्या वतीने विद्यालयाच्या भव्य पटांगणावर क्रीडा महोत्सव २०२६ चे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पाटकर एस. सी. विराजमान होते. यावेळी क्रीडा विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धेश म्हापनकर, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तृप्ती नाईक, सहाय्यक विभाग प्रमुख प्रा.आर.आर. पास्ते तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🏐🤾‍♂️🏃‍♀️
या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, अथलेटिक्स, थाळीफेक, गोळाफेक, रिले रनिंग तसेच इंडोअर प्रकारात कॅरम व बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी सर्व खेळाडूंनी क्रीडा शपथ घेतली व मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रा.भक्ती चव्हाण, प्रा. अंकिता नवार, प्रा.समीक्षा परब, प्रा.स्वप्नाली शिंगणाथ, तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👏 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडेला चालना देणारा हा महोत्सव निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
📸 क्षणचित्रे लवकरच…
#KridaMahotsav2026 #CollegeSports
#SalgaonCollege #StudentEnergy
#FitIndia #SportsForAll

प्रतिक्रिया व्यक्त करा