You are currently viewing बांदा ग्रामपंचायतीला नवे नेतृत्व; प्रभारी सरपंचपदी आबा धारगळकर
Oplus_16908288

बांदा ग्रामपंचायतीला नवे नेतृत्व; प्रभारी सरपंचपदी आबा धारगळकर

बांदा :

बांदा शहर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला आहे. विद्यमान सरपंच प्रियांका नाईक या वैयक्तिक कारणास्तव सुट्टीवर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत धारगळकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कार्यभार स्वीकारताच भाजपच्या वतीने धारगळकर यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. शहरातील विकासकामांना गती देणे, नागरी समस्या सोडवणे तसेच ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालवणे, ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रभाग क्रमांक १ चे प्रतिनिधित्व करणारे धारगळकर यांची जानेवारी महिन्यात उपसरपंचपदी निवड झाली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात सातत्य राहणार असून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा