You are currently viewing अनमोल सण

अनमोल सण

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनमोल सण*

 

भले बुरे ते विसरून जाऊ.

गुळपोळी पोटभर खाऊ.

मराठमोळ्या सण परंपरेची शान राखू.

मृदु बोलांनी व आचरणाने संस्कृती जपू.

 

काळा रंग ओढी थंडी ,चेहऱ्यावर दिसते खुशी,

फळा,फुलांची,विपुलता ,सांगा संक्रांत अशुभ कशी?

 

पोटदुखी,वात,व्रण नाहीसे करणारे गुण तिळाचे,

प्रेमाचा गोडवा व मैत्रीचा ओलावा हे गुण गुळाचे

सिमेंट क्रांक्रिटसारखे बिनतोड नाते तिळगुळाचे

 

पति पत्नीचे नाते कोरे, जमतात सारे सगे सोयरे

चंद्रकळेवर,खुलुन दिसती हलव्याचे दागीने खरे.

नववधुचे रुप साजिरे,जावयालाही हारतुरे,

ओटीतील तीळवडी,ऊस,हरभरा,गाजर, बोरे.

सांगतात मानापमान सोडून, स्नेहवर्धन करा बरे.

 

मुकुट ,हार, मोरपिसे,मनगट्या, वाक्या

लेवून सजला मनमोहन प्यारा.

चिरमुरे ,बोरे , बिस्किटे, गोळ्या,

न्हावू घाला बाळाला , बालचमुंचा जमला मेळा

हा बोरनहाणाचा सोहळा न्यारा,

 

आहे कहाणी पृथ्वी मोलाची मकरसंक्रातीची

शरपंजरी भिष्म थांबले वाट पहात उत्तरायणाची

मोक्ष मिळण्यासाठी सुर्यदेवाच्या मकरसंक्रमणाची.

 

स्नेहाचे तीळ ,मैत्रीचे गुळपीट आता कमी कशाची?

तु बोल गड्या गोड गोड तुला भिती कुणाची?

 

*//प्रतिभा फणसाळकर//*

प्रतिक्रिया व्यक्त करा