You are currently viewing संक्रांतीची चिक्की

संक्रांतीची चिक्की

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संक्रांतीची चिक्की*

 

मावशी गं मावशी

देशील का गं मला चिक्की?

जेंव्हा येईन मी

तुझ्या घरी नक्की

 

बोलेन तुझ्याशी मी खूप

करीन तुझ्याशी मी गट्टी

जेंव्हा होईन मी मोठी

खाऊन तुपासंगे रोटी

 

असेन मी खट्याळ

खेळेल तुझ्या संगे खेळ

त्यातील होईन मी राणी

परि तूच माझी गुरू वाणी

 

गुरू राणीच्या खेळात

राहतील दोन बाळ

खाली मोकळे मैदान

वर चांदण्यांचे आभाळ

 

आई समान माया तुझी

लेक मी तुझ्या बहिणीची

नाते आपले जिव्हाळ्याचे

मावशी तू अन् मी तुझी भाची

 

विसरू नको नात्याला

जेंव्हा येईन मी चिक्की खायला

बघ फिरूनी गरगरा

घरगटा चिटकला जात्याला

 

मावशी गं तुझी चिक्की

तिळागुळानं झाली पक्की

गोडवा हा प्रीतीचा

असाच राहीन का गं नक्की?

 

मावशी गं तुझी चिक्की

आवडीने खाईन मी आख्खी

गाईन मी सारखी

गोड संक्रांतीची चिक्की

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा