You are currently viewing प्रिय सखी….
Oplus_16908288

प्रिय सखी….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रिय सखी…*

 

सदैव असते सखे जवळी तू प्रसवते मला

जपते हृदय कोंदणी ममता जशी ती मुला

प्रिये असशी कामिनी दामिनी सदा तू प्रिया

कधी न जाशी सोडूनी न वाटते मनाशी भया..

 

सलज्ज तरुणी जशी सुंदरी असे गुणी साजरी

जशी मुखात गोकुळी मुखी दिसे साजरी बांसरी

मुखात असते सदा वसते हृदय कोंदणी

सदैव असे प्रिय तू जशी प्रियास गे साजणी..

 

अशीच रहा जवळी तू नकोस जाऊ दूर

विसंबता जराही तू लागतसे मना हुरहुर

अति प्रियसखी मानिनी तिलोत्तमा भामिनी

विद्दुल्लता जशी चमकते अवकाशगाहिनी..

 

सदैव भजते तुला विसंबते जरा ना कधी

कधी कधी गमते मज उदधी अथवा नदी

विहार करते सदा लढविते नव्या कल्पना

प्रसन्न करसी गडे सदैव माझ्या मना…

 

सरस्वती शारदे वरदहस्त गे तुझा

वरदान कविकुलासी तुजवाचूनी ना मजा

उपकृत तुजमुळे गडे धन्य झाले जीवन

सदाच राही संतोषे उजळीत माझे मन….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा