भाजपकडून गणेश उर्फ बंडू हर्णे, शहर विकास आघाडीकडून सत्यजित उर्फ बाळू पारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
कणकवली (प्रतिनिधी) :
कणकवली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या, मंगळवार दिनांक १३ जानेवारी रोजी होणार आहे. नगरपंचायतीत शहर विकास आघाडीचे ८ तर भाजपचे ९ नगरसेवक असल्याने दोन्ही गटांकडून प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे.
भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर शहर विकास आघाडीकडून शिवसेनेचे शहराध्यक्ष सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदी निश्चित झाल्याचे समजते.
या निवडीमुळे नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे अधिक मजबूत होणार असून आगामी काळातील निर्णयप्रक्रियेत या स्वीकृत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
