*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*जशी गजरेल फोड…*
मनी अहिरानी बोली हाई भलती से गोड
गोडआंबट ती अशी जशी गजरेल फोड
तिनी गोडी से अविट नही तुलना कसासे
जसा अबिरगुलाल विठू कपायले फासे…
हाई कपायना कुकू ठसठशीत दिसंस
मनी माय अहिरानी ख्यालीखुशाली पुसस
सूर्याचंद्रानं ते तेज मुखवर पसरसं
नातीगोती जोडसं ती नही जरा इसरस…
जशी मयाम्हा काकवी तिनी गोडी काही न्यारी
बारा महिना पुरस भरी ठेवा हो घागरी
रस उसना तो गोड तरी मनं ते भरेना
गोड अहिरानी तशी तिनी गोडी बी सरेना…
सूर्याचंद्राना तो टिका तिना कपाये लावाना
तिले गोंडानी पालखी गावभर मिरावाना
तिना करा लाडकोड तिले डोकावर धरा
वाजू द्या ना डंका तिना वाणी मधुर अधरा…
पोटम्हानी हाई बोली व्हटंम्हा बी लागे गोड
तिनासारखी तिच हो खरोखर बिनतोड
तिना सारखी तिच हो नही उपमाच तिले
धरा धरा डोकावर मनी माय अहिरानीले…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
