*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मनिषा खोबरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाळ*
गीतं जात्यावर गाता
थरथर हाता आली
लेक नातीची आठवण
गाली आसवे ओघळली..
ढग दाटती आभाळी
तशा उफाळल्या आठवणी
जड झालं जीवा तरी
लेक नातीची पाठवणी..
उद्या येईल दिवाळी
रुणझुण पावलांनी
लेक नातीचं ग येणं
गेले अंतरी भारावूनी ..
बांधी घरादाराला तोरणं
सजे आकाशी कंदील
आली नातुली लाडुली
पडे सोनियाच पाऊल..
विनविते बा विठ्ठला
दुःखाचा रे नको संग
जात्यावरी गाते ओवी
मुखे आळविते रे अभंग..✍️✍️
कवयित्री
मनिषा खोबरे
येडशी
