“संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी अटल प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम ”
मा.नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोसलें यांचे गौरवोद्गार
संस्कृत ही अनेक भाषांची जननी असून जगातील अनेक विकसनशील राष्ट्रानी ही भाषा स्वीकारल्याने या भाषेचे महत्त्व अधोरेखित झालेल असून या भाषेच्या प्रसार,प्रसार आणि संवर्धनासाठी अटल प्रतिष्ठान जे उपक्रम राबवत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद असून जिल्ह्यातील शाळांमधून या भाषेचा जागर झाला पाहिजे असे प्रतिपादन सावंतवाडीच्या नगराध्यक्षा मा.श्रद्धाराजे भोसले यानी केले.
भारतरत्न अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून अटल प्रतिष्ठान आयोजित महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ डॉ.नितीन पावसकर प्रायोजित जिल्हास्तरीय शालेय स्तरावरील संस्कृत भाषेतील विविध स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर अमुल पावसकर यानी संस्कृत भाषेचे महत्त्व आणि जागतिक स्तरावरील त्याचा होणारा वापर ज्यामुळे आपल्या देदीप्यमान भारतीय संस्कृतीचे उमटणारे प्रतिबिंब यासाठी संस्कृत भाषेचा अजून प्रचार झाला पाहिजे.शालेय अभ्यासक्रमात संस्कृत भाषा सक्तीची करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अटल प्रतिष्ठानचे कायम निमंत्रित सदस्य डॉक्टर राजेश नवांगुळ यानी संस्कृत भाषेतील सुभाषित म्हणून त्याचा अर्थही उपस्थित स्पर्धकांना सांगून संस्कृत भाषेमुळे उच्चार शुध्द होतात असे ते म्हणाले.
पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप भारमल यानी अटल प्रतिष्ठान या जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेञात समाजाभिमुख काम करत असून समाजाने अशा संस्थाना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन केले.
एकूण शालेय तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.इयत्ता पाचवी ते सहावी स्ञोञपठन, इयत्ता सातवी ते आठवी संस्कृत गीतगायन स्पर्धा व इयत्ता नववी ते दहावी कथाकथन स्पर्धा.जिल्हाभरातून या स्पर्धेत पन्नासहून जास्त स्पर्धक सहभागी झालेले होते.स्ञोञपठन स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.जुई दत्तप्रसाद हर्डीकर, खेमराज हायस्कूल बांदा,द्वितीय कु.मिरा मकरंद जोग,यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी,तृतीय कु.ओम गोपाळ गवस,कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी,उत्तेजनार्थ कु.अनन्या पुरूषोत्तम बाक्रे, एस एम हायस्कूल, कणकवली , गीतगायन गायन स्पर्धा प्रथम कु.आर्य दीनानाथ माणगावकर, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव,द्वितीय कु.सानवी सचिन देसाई, खेमराज हायस्कूल बांदा,तृतीय कु.श्रृती संजय तावडे,एस.एम.हायस्कूल कणकवली,उत्तेजनार्थ कु.आदित्य चारूदत्त सामंत,यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल सावंतवाडी.कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक कु.प्रज्ञा तुषार मौर्य ,खेमराज हायस्कूल बांदा,द्वितीय कु.मनस्वी अनंत आरोलकर एस एम हायस्कूल कणकवली,तृतीय कु.तनिष्का प्रमोद राऊळ, मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव,उत्तेजनार्थ कु.कोमल अजित परब वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव.विजेत्या सर्व स्पर्धकांना बांबूपासून बनवलेली आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.स्पर्धेचे परिक्षण संस्कृत शिक्षिका सौ.वृंदा आठलेकर- काजरेकर व श्री विवेकानंद जोशी यानी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड.नकुल पार्सॅकर यानी केले.यावेळी डॉक्टर सौ.कादंबरी पावसकर,अटल प्रतिष्ठानच्या सहकार्यवाह अँड. अनुराधा परब,विश्वस्त श्री महादेव लिंगवत, श्री रघुनाथ तानावडे,श्री राजाराम पार्सॅकर, श्री बाळकृष्ण लिंगवत, माजी सैनिक श्री नामदेव सावंत,कु.निकिता आरेकर सौ.थिटे व अटलचे पदाधिकारी,पालक व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कृत शिक्षिका सौ.तृप्ती पार्सॅकर, कार्यालयीन प्रमुख ज्योती राऊळ यानी विशेष परिश्रम घेतले.सुञसंचालन अटलच्या विश्वस्त व महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक श्रीमती अर्पिता वाटवे यानी केले.
(फोटो कॅप्शन-सहभागी स्पर्धकांसमवेत नगराध्यक्षा सौ.श्रद्धाराजे भोसले, डॉ.अमुल पावसकर, डॉ.कादंबरी पावसकर,डॉ.राजेश नवांगुळ,अॅड नकुल पार्सॅकर,प्राचार्य डॉ.भारमल व इतर )
