कोणालाही कोणतीही लक्षणे नाहीत; तहसीलदार अजय पाटणे यांची माहिती
मालवण
ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सध्या कोरोना लस डोस देण्याची कार्यवाही सुरू आहे. गेल्या १५ दिवसात तालुक्यातील शासकीय रुग्णालय डॉक्टर-कर्मचारी, खाजगी डॉक्टर-कर्मचारी यासह पोलीस, नगर पालिका व महसुल विभाग कर्मचारी अश्या ६६८ व्यक्तींना आजपर्यंत कोरोना लस देण्यात आली आहे.
लस घेतल्या नंतर कोणालाही कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. लस सुरक्षित आहे. अशी माहिती मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली. त्यांनी स्वतः कोरोना लस घेतली आहे. तालुक्यात सर्वात पहिली लस वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी घेतली.