सावंतवाडीत उद्या भव्य मॅरेथॉन स्पर्धा
आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
सावंतवाडी
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार, ११ जानेवारी रोजी सावंतवाडी शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सकाळी ७ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथून सुरू होणार आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता होणार आहे. रविवारी सुटीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या उपक्रमात सावंतवाडी शहरासह परिसरातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग सैनिक स्कूल प्रशासन व सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
