You are currently viewing डोंबिवली येथे दि. १८ जानेवारी रोजी कोकणवासी मित्र मंडळाचे स्नेहसंमेलन आयोजन

डोंबिवली येथे दि. १८ जानेवारी रोजी कोकणवासी मित्र मंडळाचे स्नेहसंमेलन आयोजन

ठाणे / (प्रतिनिधी) :

कोकणवासी मित्र मंडळ डोंबिवली यांचे रविवार दि.१८ जानेवारी २०२६ रोजी ३८ वे वार्षिक स्नेहसंमेलन सर्वेश सभागृह डोंबिवली ( पूर्व) येथे सायंकाळी ५ ते ९ या वेळेत संपन्न होणार आहे. सदर मंडळ प्रतिवर्षी परस्परांच्या ओळखीतून स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने तसेच कौटुंबिक जिव्हाळा टिकून राहावा.

तद्वतच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेशभूषा , रंगारंग स्पर्धा सोबत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक, युवती, महिला, पुरुष यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे गाबीत, क्षत्रिय मराठा, आरमारी, दर्यावर्दी मराठा, गोमंतक क्षत्रिय मराठा ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपरोक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा