You are currently viewing शब्दांनाही होते बाधा

शब्दांनाही होते बाधा

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दांनाही होते बाधा*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

वाटले नव्हते बाधा शब्दांनाही होते

पण झाली एव्हढे मात्र खरेच वाटते

 

अशी कोणती विषण्णता, की खंत

कधी कुणा छळून गेली कां ? वाटते

 

शब्दातली भावमृदुलता ती हरवली

हे मात्र आज सहजी जीवा जाणवते

 

अर्थ भक्तिप्रीतीचा कां कधी बदलतो

कां ? सलगी भरवशाची वावगे ठरते

 

कां कुणी जाणतो कधी तळ मनाचा

जीवनी कळणे खूप दुरापास्त असते

 

किती अन कसा ताण द्यावा तर्कांना

स्वतःलाच समजावणे अवघड असते

 

सत्य एकची नाती सारी ऋणानुबंधी

जे आहे तेच निमूटपणे सहावे लागते

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*विगसा*

*( 9766544908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा