You are currently viewing सामान्य माणसे

सामान्य माणसे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सामान्य माणसे*

 

आम्ही आहोत असे तसे

आम्ही आहोत सामान्य माणसे

आम्ही नाही श्रीमंत

अन् नाही भिकारी

या दुनियेत आम्हाला

कोण विचारी ?

ही दुनिया जगते कुणावरी ?

 

कोणी धरतो उद्योगाची दोरी

कोणी करे मोठ्या पगाराची नोकरी

कोणी जगतो व्यवसायावरी

गत आमची खाऊन भाजी भाकरी

इकडे आड तिकडे विहीरी

 

श्रीमंत आणि गरीबही म्हणतात

सामान्य माणसे सुखी

आमची दुःखे आम्हालाच माहीत

या जगात असतो कोण सुखी?

 

स्वप्ने पाहतो श्रीमंतीची

लक्षणे असतात दारिद्र्याची

ओढ असते स्वर्ग सुखाची

वाट मिळेल का देवाघरची ?

 

हळूच डोकावून पहातो

श्रीमंतांच्या संसाराकडे

आणि गरीबांच्या दारिद्र्याकडे

बघून त्यांची दुःखे चला गडे

वाट धरावी आपल्याच जीवनाकडे

 

आम्ही आमच्या जीवनात दुःखी असू

आम्ही आमच्या जीवनात सुखी असू

आम्ही शेवटी असू कसे

आम्ही असू सर्व सामान्य माणसे

 

कवी:-

चंद्रशेखर प्रभाकर कासार

चांदवडकर, धुळे.

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा