*नववर्षानिमित्त आयोजित चित्रपटगीतांच्या मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
पिंपरी
नववर्षानिमित्त
विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘बच के रहना रे बाबा…’ या हिंदी – मराठी चित्रपटगीतांच्या सुमधुर, नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात गुरुवार, दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या खास सांगीतिक मैफिलीस राजू भिंगारे, सुनीता भिंगारे, साक्षी भिंगारे, सार्थक भिंगारे, अक्षदा यादव, वंदना यादव, मंदाकिनी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, प्रदीप गांधलीकर, मुकेश चौधरी, नेहा चौधरी, सुधाकर पाढळकर, विलास गाधडे, महीपत वर्पे, मोहन भस्मे, सानिका कांबळे, शुभम इगवे, साहिल कांबळे, राजेंद्र पगारे, नितीन यादव, डाॅ. अशोक नगरकर, नीलिमा भिंगारे, सतीश भिंगारे, सुहास पालेकर, शैलजा पालेकर, सनी शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.
अतिथी गायिका ललिता जगदाळे तसेच शुभांगी पवार, स्वाती भागवत, नेहा दंडवते, सुचिता शेटे – शर्मा, स्मिता उरणकर, शर्मिला डंबे, अरुण सरमाने, डॉ. किशोर वराडे, चंद्रकांत हिवरकर, सतीश गडचे, सुधाकर बाविस्कर, पिनाक भिंगारे, दिनेश कर्वे, अनिल जंगम, नंदकुमार कांबळे आणि विनायक कदम या गायक कलाकारांनी हिंदी – मराठी चित्रपटातील वैविध्यपूर्ण गीतांचे प्रभावी सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्रत्येक गीताच्या सादरीकरणासोबत त्या गीताच्या संबंधित चित्रपटातील दृश्ये पार्श्वभूमीवरील पडद्यावर दाखवण्यात आल्याने रसिक श्रोत्यांना स्मरणरंजनाचा उत्कट आनंद अनुभवता आला. मैफलीत ‘ऑंखोंसे से जो उतरी…’ , ‘आने से उसके…’ , ‘ए सनम जिसने तुम्हे…’ , ‘मेरे मेहबूब कयामत होगी…’ , ‘किसीकी मुस्कराहटोंपे…’ , ‘प्यार माँगा हैं…’ , ‘दिल में हो तुम…’ या एकल गीतांसोबतच ‘प्यार करनेवाले…’ , ‘दो कदम तुम भी…’ , ‘फुल तुम्हे भेजा हैं…’ , ‘दिल की ए आरजू थी…’ , ‘कोरा कागज था…’ , ‘वादा करले साजना…’ , ‘दिवाना हुआ बादल….’ , ‘आजकल तेरे मेरे…’ , ‘जाने दो जाने दो…’ , ‘इतना न तू मुझसे…’ अशा एकाहून एक श्रवणीय युगुलस्वरातील गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ‘मैं हूं झुमझुम झुमरू…’ या किशोरकुमार यांच्या याॅडलिंगगीताला वन्स मोअरसह मिळाला; तर ‘माळ्याच्या मळ्यामंदी…’ , ‘मी तर भोळी अडाणी ठकू…’ , ‘अश्विनी ये ना…’ या मराठमोळ्या गीतांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. ‘बच के रहना रे बाबा…’ या शीर्षकगीताने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीला ‘आए मेरे हाथोंमें…’ या बहारदार गीताने कळसाध्यायाकडे नेले. कार्यक्रमादरम्यान उषा शेटे आणि दिलीप तापकीर यांच्या हस्ते सर्व श्रोत्यांच्या वतीने नंदकुमार कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती; तर विनायक कदम यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी विशेष सहकार्य केले. राजेंद्र देसाई यांनी ध्वनिसंयोजन केले. विक्रम क्रिएशन यांनी दृकश्राव्यचित्रण केले. नागेश झळकी यांनी छायाचित्रण
केले. सीमा गांधी यांनी मैफलीचे निवेदन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
