*गीतेश राऊत याला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण -वैभव नाईक*
*प्रभाग क्र.८९ च्या विकासासाठी गीतेशला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे मा.आम.वैभव नाईक यांचे मतदारांना आवाहन*
*गीतेश राऊत यांच्या प्रचारार्थ मा.खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांताक्रूझ येथे कॉर्नर सभा संपन्न*
शिवसेनेने कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. मुंबईतील मराठी माणसाचा आवाज बनण्याचे काम शिवसेनेने केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून मुंबईवर होणाऱ्या अन्याविरोधात संघर्ष केला आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक अन्यायग्रस्त नागरिकांची ढाल बनून नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीची सत्ता येणे गरजेचे आहे. अन्यथा ही मुंबई ठेकेदारांच्या घशात जाईल. मुंबईचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वांनी या निवडणुकीत मेहनत घेतली पाहिजे. प्रभाग क्र.८९ मधून उद्धवजींनी तरुण तडफदार आणि ध्येयवादी असलेल्या गीतेश विनायक राऊत याला उमेदवारी दिली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत काम केल्यामुळे गीतेश राऊत याला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. त्यामुळे आपल्या प्रभागाच्या विकासासाठी गीतेश हा योग्य उमेदवार असून मोठ्या मताधिक्याने त्याला निवडून द्या असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
मुंबई महानगरपालिका निवडणूकितील सांताक्रूझ (पूर्व) या प्रभाग क्र.८९ चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीचे उमेदवार गीतेश विनायक राऊत यांच्या निवडणूक प्रचारार्थ माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांताक्रूझ (पूर्व)वाकोला येथे कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याप्रसंगी आनंद दुबे व शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
