You are currently viewing माजी सैनिक व विधवा पत्नींसाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन

माजी सैनिक व विधवा पत्नींसाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन

माजी सैनिक व विधवा पत्नींसाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – मुख्यमंत्री योजना अंतर्गत आयुष्यमान कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

ज्या माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नींनी अद्याप आयुष्यमान कार्ड काढले नसेल त्यांनी अशा वर्कर, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा तालुक्याच्या पुरवठा शाखेत संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.

            जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नींनी या योजनेंचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क  करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा