*महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत सत्कार .*
*महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान . —– नगराध्यक्ष राजन गिरप*
भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता गावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सिंधुदुर्गातील तीन खेळाडुंच्या सहभागातून ” उमंग राष्ट्रीय ट्राॅफी २०२५ ” जिंकली त्याबद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
मध्यप्रदेश भोपाळ येथे उमंग गौरवदिप वेल्फेअर सोसायटी तर्फे उमंग राष्ट्रीय दिव्यांग महीला क्रिकेट कप २०२५ चे आयोजन ओल्ड चॅम्पियन्स मैदानावर करण्यात आले होते . अंतिम सामन्यात झारखंड राज्याला पराभूत करून महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय मिळवला .
महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मिता सुनिल गावडे हिने संघाचे नेतृत्व केलेल्या संघात सिंधुदुर्गातील शिल्पा गांवकर ( आचरा – मालवण ) , दिक्षा तेली ( देवगड ) यांचा समावेश होता . सिंधुदुर्गातील तीन दिव्यांग महिलांनी दिव्यांगावर मात करुन क्रीडा प्रकारात अग्रेसर आहोत हे दाखवुन दिले . तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करुन चॅम्पियन ट्राॅफी आपल्या राज्याला मिळवुन दिली याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले .
यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , सहसंयोजक श्यामसुंदर लोट व प्रकाश वाघ , नगरसेवक सुधीर पालयेकर , सुनिल घाग , ललित गावडे , साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा रुपाली पाटील , दिव्यांग विकास केंद्र उपाध्यक्ष अस्मिना मकानदर , सचिव प्रणिता पेंडसे उपस्थित होते .
