You are currently viewing मोगरा

मोगरा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मधुबाला शालिग्राम पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मोगरा*

 

मोगऱ्याचा सुगंध अहा.. हा

कळी फुलांचा थाट किती तो असे

माळून मोगरा मुग्धा हासत लाजतसे

कटाक्ष प्रियाला लटका गोड टाकितसे

१)

प्रिय विठ्ठला अर्पूनी पायी स्वत्वाला

भाग्य मानीत फुलवित स्वतःला बसे

प्रेम भक्तीचे बंधन अतुट सावळ्याशी

सुगंध गाभारी भक्त जनांना खुलवितसे

२)

हिरव्यागार कोवळ्या चमचमत्या पानात

कळ्या फुलांचा बहरुनी आला फुलोरा

भक्तांसी आनंद हा विठ्ठला आवडी मोगरा

मोगऱ्या लोभस तृप्तीत सार्थकी किनारा

३)

पाहूनी मोगऱ्याला चांदणेही नादावले

शुभ्रकळी चांदण्या बरसल्या हासऱ्या

गंधाच्या उन्मेषाने पवन धरा बहकले

हिरव्या शालूवरी दिसती त्या नाचऱ्या

४)

मृदगंध धरतीसंग सुवासाने गंधाळली

बागेत ताटवे शुभ्र कळ्यांनी बहरली

अतुट प्रिती मिलनात धुंद बागडली

गंध शिंपीत वेडी यौवन प्रीत रसरसली

५)

अजुनही प्रेमी युगलांचा बहरलेला गजरा

आठवे क्षण स्नेहाचे माळूनी दिवस हासला

तोच स्नेह दिसे वसंताचा प्रीती मोगऱ्याला

अजुन काय हवे गोड अतुट प्रितबंधनाला

६)

गंध शिंपीत जातो भान वेडावून पवन

दिलासा अधिर मन्मनी गंध गेला सांगून

कळ्यांची झाली फुले हर्षित तो वसंत

बुजरे देखणे रुप सिमटून गेले लाजून

७)

〰️〰️〰️〰️〰️

स्वरचित काव्य,

मधुबाला शालिग्राम पाटील

मुलुंड, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा