You are currently viewing ओम नमो गणराया…!
Oplus_16908288

ओम नमो गणराया…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ओम नमो गणराया…!*

 

 

ओम नमो गणराया, विघ्नहर्ता तू महान,

शुभारंभी तुझे स्मरण, दूर होई अज्ञान..

 

मंगलमूर्ती, करुणासागर, भक्तांचा तू प्राण,

ओम नमो गणराया, लाभो जीवनास ज्ञान..

 

लंबोदर तू विशाल हृदयी, दीनांचा आधार,

तुझ्या कृपेने उजळे वाट, हरपतो अंधार..

 

एकदंता, तूच दाखविस सत्याचा विचार,

तुझ्याच चरणी नतमस्तक, मिटतो भवसंसार..

 

मूषकवाहनावर विराजे, नम्रतेचा धडा,

अहंकाराचा भार उतरवी,तूच असशी मनकवडा..

 

शहाणपणाची शिकवण देई, जीवनाचा फळा,

तुझ्या कृपेने फुलतो मार्ग, टळे भवजाळा..

 

ऋद्धी-सिद्धी संगतीला, समृद्ध होई जीव,

तुझ्या आशिर्वादाने फळे, प्रत्येक स्वप्न-शिव..

 

कर्तृत्वाला दिशा देशी, वाढविसी आत्मविश्व,

ओम नमो गणराया, घडवीस जीवन-नवजीव..

 

शब्द अपुरे तुझ्या महिमेस, भावना मौनात,

तूच मार्गदर्शक, तूच सखा, प्रत्येक क्षणात..

 

संकटांची रात्र सरते, तुझ्या नामस्मरणात,

ओम नमो गणराया, उजाडे नवे प्रभात..

 

प्रज्ञेच्या या शब्दांतून, वंदन तुजला देई,

भक्ती, श्रद्धा, कर्मयोग, तूच आम्हा शिकवी..

 

जीवनपथ सदैव तूच दीप उजळवी,

ओम नमो गणराया, आम्हां विजयी ठरवी..

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा