You are currently viewing लाज वाटतेय माझी मला

लाज वाटतेय माझी मला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लाज वाटतेय माझी मला*

 

 

अशाच एका *संध्याकाळी*

संध्याने माझी वरात काढली

घेऊन गेली रंकाळ्या काठी

विचित्र मागणी करून बसली

//1//

मित्र समजतोस सख्खा मजला

उभा रहाशील कां *माझे पाठी*

बाप होशील कां माझ्या बाळाचा

एवढे करशील कां माझ्यासाठी

//2//

शेण खाल्ले *सौंदर्य स्पर्धेत*

तडजोड केली “बक्षिसासाठी”

पुरी करून मागणी नको ती

उत्तर शोधतोय तळ्याकाठी

//3//

आत्महत्या नाही उत्तर त्याचे

नाही मारणार *तान्हुल्याला*

जगात येण्याचा हक्क त्याचा

असतो कां हो कुमारी मातेला

//4//

न्याय देतांना शरीर सुखाला

समाजाकडे झालेय *दुर्लक्ष*

घाईत घेतला निर्णय चुकीचा

घेईल कुणी कसा माझा पक्ष

//5//

झेऊन निर्णय मोठा धाडशी

झाला तयार बाबा व्हायला

देणार आहे तो नाव बाळाला

*लाज वाटतेय माझी मला*

//6//

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा