*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*२०२६ चे आगमन*
गाठ घ्यायला सर्वांची झालोय मी अधीर
चालेल ना तुम्हाला राहीन म्हणतो वर्षभर
येतो उद्या आठवण काढालं आयुष्यभर
हसतमुखाने चालू नव्या वाटा खडतर
आनंदी राहूनच हिम्मत येते खरोखर
चांगले वाईट भोगेन तुमच्याच बरोबर
जीवा पलीकडे प्रत्येक क्षणी देईन साथ
पाळीन शब्द एक वर्ष हीच माझी शपथ
सर्वसाक्षी मी तुमच्या प्रत्येक कृतीला
सांभाळा तब्येत दोष न देता प्राक्तनाला
गेला जरी दुखावला तरी समनव्य साधा
संदेश मोलाचा नात्यात नाही येणार बाधा
स्वीकार करा नव्या पिढीच्या कल्पनांचा
करा विचार त्यांच्या पुढील आव्हानांचा
नाही दुजा आंनद समवयस्का शिवाय
नाही पर्याय नववर्ष स्वीकारण्या शिवाय
*प्रतिभा फणसळकर*
