*ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खोपा विणते शब्दांतून*
भावनांच्या नक्षीने
खोपा विणते शब्दांतून
मधुर आठवण
झुळुकीने…
झुळकीसह अलवार
ममतेचा रेशीमधागा बांधते
श्वास देते
ओळींतून…
ओळींतून अर्थाला
काव्यात जणू लपवते
सूर होते
हळवेसे…
हळव्या स्मृतींनी
आशयाचा हात होते
मन जपते
शब्दांतून…
शब्दांतून आठवणींच्या
स्वप्नांना संथ विणते
वादळाला थोपवते
मनातल्या…
मनातले पाखरू
कधी काव्यातून फडफडते
श्वासास स्पर्शते
नजरेने…
नजरेने ओळ
झाडाची फांदी होते
खोपा विणते
शब्दांतून…
शब्दांतून आनंदाश्रू
सारेच ओळीत ओवते
आयुष्य गुंफते
स्वप्नांत…
प्रज्ञा घोडके, चिंचवड, पुणे©®
