सावंतवाडी / मळगाव :
मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर आयोजित कै.प्राचार्य रमेश कासकर मित्रमंडळ प्रायोजित स्व. प्रा रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता वाचन मंदिराच्या कै.रमाकांत खानोलकर सभागृहात करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ही शालेय विद्यार्थ्यांसाठी असून पाचवी ते सातवी गटासाठी 1. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या कथा, 2. संस्कार कथा, असे विषय देण्यात आले आहेत. यासाठी चार ते पाच मिनिटे वेळ दिला असून स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ₹551 द्वितीय क्रमांक ₹451 तृतीय क्रमांक ₹351 व उत्तेजनार्थ दोन ₹101 अशी पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रमाणपत्र व ग्रंथभेट देण्यात येणार आहे. आठवी ते दहावी या गटासाठी 1. स्वामी विवेकानंदांच्या कथा, 2. विज्ञान कथा, हे विषय देण्यात आले असून वेळ पाच ते सहा मिनिटे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास ₹751 द्वितीय क्रमांक ₹551 तृतीय क्रमांक ₹351 व उत्तेजनार्थ क्रमांक प्रत्येकी ₹201 रोख पारितोषिके प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटात दोन विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. स्पर्धक व शाळांनी आपली नोंदणी दिनांक 29 जानेवारी 2026 पर्यंत ग्रंथपाल श्री आनंद देवळी यांजकडे मोबाईल क्रमांक 9421149344 / 9029898290 यावर करायची आहे. सदर स्पर्धेत भाग घेण्याकरिता विद्यार्थ्यांना शाळांनी प्रोत्साहित करावे असे आवाहन वाचन मंदिर तर्फे करण्यात आले आहे.
