You are currently viewing मुंबई–गोवा महामार्गावर हुंबरट येथे कपडे विक्रेत्याची दुचाकी आगीत खाक

मुंबई–गोवा महामार्गावर हुंबरट येथे कपडे विक्रेत्याची दुचाकी आगीत खाक

मुंबई–गोवा महामार्गावर हुंबरट येथे कपडे विक्रेत्याची दुचाकी आगीत खाक

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर हुुंबरट येथे कोल्‍हापूरच्या कपडे विक्रेत्‍याची दुचाकी जळाली. दुपारी दीड च्या सुमारास चालत्या दुचाकीला आग लागली. यात ८० हजार रूपयांची दुचाकी आणि ३५ हजार रूपयांचे कपडे आणि इतर साहित्‍य देखील आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
उद्या सावंतवाडीच्या आठवडा बाजारात कपड्यांचे दुकान लावण्यासाठी कोल्‍हापूर येथून विक्रांत सुरेश चव्हाण आणि त्‍याचा सहकारी अाकाश ललवाणी हे ॲक्‍सेस १२५ ही दुचाकी (एमएच ९० जीडी ३५२०) घेऊन कोल्‍हापूर येथून तळेरे मार्गे सावंतवाडीला जात होते. वाटेत हुंबरट येथील बॉक्‍सवेल पुलावर त्‍यांची दुचाकी आली असता अचानक दुचाकीने मागून पेट घेतला. हुंबरट पुलाच्या बाजूला गाडी थांबवून त्‍यांनी दुचाकीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणात संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा