You are currently viewing .तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न

.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न

*डॉ.तानाजीराव चोरगे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी श्रमसंस्कार शिबिर ढाकमोली येथे उत्साहात संपन्न*

कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न, डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय मांडकी पालवण या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार निवासी शिबिर ढाकमोळी येथे बुधवार दि.२४ डिसेंबर २०२५ ते मंगळवार दि.३० डिसेंबर २०२५ मध्ये संपन्न झाले. दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी ढाकमोली (सहाणवाडी ) येथील सहाणेवर दुपारी ३ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. अंजलीताई चोरगे व कार्यक्रमाच्या उद्घाटक ढाकमोळी गावच्या सरपंच भारती लाड उपस्थित होत्या. तसेच माजी सरपंच महेंद्र बारगोडे, ग्रामसेवक दिनेश पारशी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यादिवशी विद्यार्थ्यांचे न्याय, स्वातंत्र्य,बंधुता, एकात्मता, समानता हे पाच गट पाडून नियोजन सुरू झाले.
दि.२५ डिसेंबर रोजी बौद्धिक सत्रात प्रा. मिलिंद कडवईकर यांनी ‘मी यशस्वी होणारच !’ या विषयावर मार्गदर्शन केले. २६ डिसेंबर रोजी युगंधरा राजेशिर्के यांनी आनापन विपशना या विषयावर मार्गदर्शनपर प्रात्यक्षिक करून दाखवले. दि.२७ डिसेंबर रोजी पुष्पा पाटील यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. दि २८ डिसेंबर रोजी विलास डिके यांनी ‘भारतीय संविधान आणि विद्यार्थी’ या विषयावर मार्गदर्शन केले. २९ डिसेंबर रोजी कॉम्रेड संदिप पवार यांनी ‘समाज जागृतीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका’ याविषयावर मार्गदर्शन केले.३० डिसेंबर रोजी शिबिराच्या समारोप कार्यक्रमच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे होत्या. या कार्यक्रमाला ढाकमोळी गावच्या सरपंच सौ. भारती लाड, माजी सरपंच महेंद्र बारगोडे, भरत लाड, जयंत लाड,ग्रामपंचायत सदस्या अमिता लाड, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश लाड, अशोक महाडिक, हर्षद लाड माजी विद्यार्थिनी साक्षी लाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात गावातील शाळा, धार्मिक स्थळे, पाणवठे यांची स्वच्छता, गाव सर्वेक्षण व प्रत्येक वाडीत आरोग्य अधिकाऱ्यांना नेऊन आरोग्य शिबीर, स्वच्छता रॅली, पथनाट्य व विविध विषयावर चर्चासत्रे इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. या शिबीरात उल्लेखनिय कामगिरी म्हणजे गावात एकूण पाच बंधारे बांधण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सानिया मुल्लाजी व प्रा. वर्षा डिके, प्रा संदिप येलये, प्रा. अशोक लाड व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा