*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गाली गुलाब फुलताना*
गाली गुलाब फुलताना
आसवे पळून गेली
मी वेणीत खोचलेली
वाया कळी न गेली..//धृ//
लावून जोर थोडा
मनवले प्रियेला
रात्रीस जोर होता
उदयीच तो पळाला…1
समजुतीत थोडा
समज *गैर* होता
भरभरून वचन देता
घुस्सा बिळात लपला..2
लावून प्रेम “दोर”
चिंता निघून गेली
प्राची समीप येता
प्रिया मनात हसली…3
लावून बोट मधाचे
वळली उजव्या कुशीला
पाहून ऊभा समोर
गाली गुलाब फुलला….4
करता प्रयत्न थोडा
स्वारी तयार झाली
गाली खळी गुलाबी
क्षणी ती प्रसन्न दिसली..5
स्वरचित भावकाव्य
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157
