You are currently viewing क्रांतीज्योती माय सावित्री

क्रांतीज्योती माय सावित्री

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

क्रांतीज्योती माय सावित्री

 

अंधार चिराया नभीचा सूर्य झाली सावित्री,

अडाणी लेकिंसाठी ज्ञानाची पंढरी ती झाली सावित्री…१

 

दगड धोंड्यांचा मार सोसून ती हसली सदा,

स्त्री शिक्षणाची पहिली पायरी ती झाली सावित्री…२

 

शेणाने माखले अंग तरीही डगमगली नाही,

अन्यायाच्या विरुद्ध धगधगती मशाल ती झाली सावित्री…३

 

पुण्यात पेटवली ज्योत तिने विद्येची पहिल्यांदा,

दीन-दलितांच्या आयुष्याची शिदोरी ती झाली सावित्री…४

 

पती ज्योतीबांच्या खांद्याला लावून खांदा चालली,

स्त्री शक्तीचा जणू एक आदर्श ती झाली सावित्री….५

 

उघडले पाण्याचे हौद तहानलेल्या लोकांसाठी,

मायेचा अथांग असा एक सागर ती झाली सावित्री…६

 

आज शिकली प्रत्येक मुलगी ताठ मानेने जगते,

आमच्या यशाची खरी गरुडझेप ती झाली सावित्री…७

 

भिडे वाड्यात पेटली जी एक इवलीशी ज्योत,

आज नभी झळकणारी नक्षत्रांची माळ ती झाली सावित्री….८

 

शिकविली अक्षरे ज्यांनी या लेकी-बाळीना,

साऱ्या जगाची माय- माऊली ती झाली सावित्री….९

 

जुलमाच्या साखळ दंडातून मुक्त केले मनाला,

स्त्री शक्तीच्या क्रांतीची पहिली आरोळी ती झाली सावित्री….१०

 

 

सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा ,सिंधुदुर्ग..

प्रतिक्रिया व्यक्त करा