मालवण :
मालवण येथील ब्राह्मण देवालयायाचा 17 वा वर्धापन दिन सोहळा 21 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता समीर कदम यांचे भजन, रात्री दहा वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोलीचा ‘अघोरी भैरव’ नाट्यप्रयोग होणारे आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ब्राह्मणदेव मित्रमंडळ व सातेरी मंडळातर्फे करण्यात आले आहे.