You are currently viewing सावित्रीमाता फुले यांचे समर्पण

सावित्रीमाता फुले यांचे समर्पण

*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*सावित्रीमाता फुले यांचे समर्पण*

 

मित्रांनो आपण सावित्रीमाता फुले यांच्या जीवनकार्याचं वाचन केलं असेल.समजून घेतलं असेल.समाजाला बोलण्यातून,भाषणातून, मिटिंगच्या माध्यमातून, वैचारिक व्यासपीठावर तुम्ही सांगितलंही असेल मी वेगळं सांगायच असं काही नाही.काळ बदलतो,तशी इतिहासाची पाने उलगडत असतात.माणूस इतिहास पाहून पुढील काळाची मूठ बांधत असतो.

मध्यंतरी जगभर कोरोणानी थैमान घातलं होतं.कोरोनाची लागन झालेल्या माणसांचा जिव वाचविण्यासाठी डॉक्टर नर्सेस खूप खूप प्रयत्न करत होते.हे कार्य करीत असताना त्यांचेही समर्पण झालेले आपण पाहिले.जगात परिचारिका,डॉक्टर, पोलिसा सहित हजारो लोकांनी आपले बलिदान केलेलं आहे.ही प्रेरणा,ही ऊर्जा मिळते कुठून… ती माता सावित्री आणि डॉक्टर यशवंतराव फुले यांचेकडून.या माय लेकरानी प्लेगच्या महामारीत केलेले कार्य.तो इतिहास पुसला जात नाही. मित्रानो ती प्रेरणा माता सावित्री कडून आम्हाला मिळते.

त्यांनी कलेले कार्य, केलेला त्याग,ते समर्पण या संदर्भात मी आपल्या समोर माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे.महात्मा जोतिबा फुले,माता सावित्रीबाई फुले,यांनी केलेले कार्य.ते म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतातिल हिंदू धर्म या धर्माने घालून दिलेले नियम, रिती रिवाज ,रूढी परंपरा ज्या मानवी मूल्यास घातक होत्या.त्या शोधून काढल्या.त्याची योग्यता, अयोग्यता त्याचं सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला.आणि काही रूढी परंपरेचा घात करून त्या बदलण्याचे काम या महात्म्यांनी केले.त्या मधील अती महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बालविवाह प्रतिबंध,सतीप्रथा विरोध,बाल हत्या,विधवा गरोधर माता हत्या, आत्महत्याला विरोध, अस्पृश्यता निवारण अशा विविध रुढी परंपरेला नाकारून सामाजिक बदलासाठी उभं आयुष त्यांनी घालवलं.भारतामध्ये पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू केली.त्यानंतर दलित मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या.भारतामध्ये स्त्री शिक्षिका म्हणून पहिला सन्मान माता सावित्री यांना जातो.महात्मा फुले आणी सावित्री मातेनी सत्य शोधक समाजाची स्थापना करून समाजातले सत्य लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या उपर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काडली.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली.आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजे संभाजी यांचा खरा इतिहास समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला.हे महान कार्य महात्मा ज्योतिबा फुलें यांनी केलं.म्हणून जोतिबा फुल्यांना महात्मा जोतिबा फुले म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. हे कार्य करीत असतांना महात्मा ज्योतिबा फुले याचा मृत्यू झाला.

हे सामाजिक बदलाचे कार्य करीत असताना १८९७ साली प्लेगची साथ सुरू झाली.कोल्या कुत्र्या सारखी माणसं मरायला लागली.अशावेळी जीवाची परवा न करता माता सावित्री य‍ांनी डॉक्टर यशवंतराव फुले यांना पुण्याला बोलावून घेऊन घेतले.पुण्यामध्ये ज्या ठिकाणी प्लेगचा प्रभाव जास्त होता.तेथे दवाखाना सुरू केला.सावित्री मातेनी लोकांना आव्हान करून दवाखान्यांमध्ये उपचार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होत्या.प्रेरणा देत होत्या लोक यायचे उपचार घ्यायचे.आणी निघून जायचे.यातले कोणी जगत होतं.कोनी मरत होतं. अनेकांची तडफड पाहून हाहाकार माजलेलं चित्रण सावित्रीमाता स्वतःच्या डोळ्यानी पाहत होत्या. लोकांना दवाखान्यात येण्याचं आवाहन करीत होत्या. लोकांची होणारी तगमग पाहून पुन्हा सावित्री उठायच्या आणी लोकांना उपचारासाठी आव्हान करायच्या.ही लढाई हे युद्ध माता सावित्री लढत होत्या.प्लेग या महामारीच्या विरोधात कार्य करत होत्या.एकीकडे प्लेग पासून बचाव करण्यासाठी लोकांना समजवायचं आणि दुसरीकडे लोकांना दवाखण्यात जाण्यासाठी जागृत करायचं. सावित्रीमातेच हे काम सुरूच होतं.डॉक्टर यशवंत आणि माता सावित्री या मायलेकरांची जीवघेणी लढाई प्लेगच्या विरोधात सुरू होती.

त्या दोघांनाही माहित होतं यामध्ये आपलाही घात होऊ शकतो.तरी ते थांबले नाहीत. डगमगले नाहीत हरलेही नाहीत.अशीच सेवा करता करता एक दिवस दवाखान्यापासून सात किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणापासून नऊ वर्षाचं मुल पाठीवर झोळीत घेऊन तेव्हडं अंतर चालत चालता दवाखाना गाठताना सावित्रींना प्लेगची लागण झाली. त्यातच माता सावित्रीचं निधन झालं.त्या पाठोपाठ डॉक्टर यशवंताचही काही दिवसाणी निधन झालं. हा शौर्याचा इतिहास लिहिला गेला.हा संघर्ष.हे समर्पण. हे मातृत्व.हे दातृत्व.माता सावित्रींनी आम्हाला शिकवलं.माता सावित्री आणी डॉक्टर यशवंत यांच्या प्लेग या साथितिल कार्याचा इतिहास आज समोर ठेवतो आहे.

मित्रांनो त्यांनी दिलेल्या बलिदानाची, आत्मसमर्पणाची

सावित्री माता,महात्मा ज्योतिबा फुले,डॉक्टर यशवंत यांनी केलेलं कार्य याची नोंद उभ्या जगाने घेतली.म्हणून महाराष्ट्रामध्ये माता सावित्रीचा साहित्य निर्माण झालं.पुणे विद्यापीठाला माता सावित्रिचं नाव दिलं. हा लौकिक त्यानी केलेल्या कर्मांचा आहे..

त्याच त्यागी,विश्ववंदनीय, कर्मयोगी,माता सावित्रीचा जन्मदिवस आहे.घराघरात साजरा करूया विचाराचा प्रचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

जय हो सावित्री.

 

लेखक:-भूमिपुत्र वाघ

प्रतिक्रिया व्यक्त करा