*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शीर्षक : स्वप्नांना पंख नवे*
स्वप्नांना पंख नवे म्हणती कसे
मज हेच हवे, जे नवे तेच हवे
गतवर्षी पाऊलखुणा सोडुनी
नववर्षाचे सुंदर लेणे मन भावे /१/
मनाच्या हिंदोळ्यावर झुलती
नव स्वप्नांचे रंगीत आकाशदिवे
त्यांच्या गवाक्षांतुनि झिरपती
आकांक्षांचे सप्तरंगी किरण नवे /२/
या हो या सारे गाऊ गीत नवे
सर्वांनी मिळून करु स्वागता
नववर्षाचे फुलती हास्यथवे
गतवर्षास साश्रू निरोप देता /३/
कालचक्र फिरे दावीत किमया
त्यास नसे कुणाचीच चिंता
स्वार्थाभोवती फिरते दुनिया
येणारा दिन असाच ओसरता /४/
करु नका तुम्ही उगाच क्षिती
हसतखेळत नवागताची नांदी,
कटुता न मागची,उदास स्मृती
नवोर्मिने नित राहू सारेआनंदी /५/
उद्याउगवेल नवप्राचीशुभारंभी
स्वर्णकिरणोत्सर्ग स्वागतारंभी
सुसंस्कृत वरदान मिळे मानवा
सद्भावना,सत्संग नववर्षारंभी /६/
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कला शिक्षिका.
