*सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा भाजपा च्या वतीने सत्कार.*
*सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष पदी शरद मेस्त्री यांची सलग दुसर्यांदा निवड .*
वेंगुर्ले
शरद मेस्त्री यांची सलग दुसर्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , जि.का.का.सदस्य व नगरसेवक सुहास गंवडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ व वृंदा गवंडळकर व श्रेया मयेकर , नगरसेवक सचिन शेटये , किरण कुबल , नगरसेवीका रिया केरकर – गौरी माइणकर – गौरी मराठे – आकांक्षा परब , हसीनाबेन मकानदार , तसेच विश्वकर्मा समाजाचे संतोष मेस्त्री , आनंद मेस्त्री , महादेव मेस्त्री , अच्युत मेस्त्री इत्यादी उपस्थित होते .
