हिंदू–मुस्लिम–ख्रिश्चन बांधवांच्या उपस्थितीत भक्तिभावाने सोहळा; महाप्रसाद व भजनांचा रंगतदार कार्यक्रम
कणकवली :
साईबाबा सोशल क्लब, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वागदे कणकवली येथे गुरुवारी १ जानेवारी रोजी श्री साईबाबांच्या मूर्तीची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. या मूर्ती स्थापनेचा विशेष उल्लेखनीय भाग म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा तीन धर्मीय व्यक्तींनी एकत्र येत विधिवत स्थापना केली. या वेळी सुधीर साठम, जावेद शेख आणि मिंगेल मंतेरो यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना करण्यात आली.
या प्रसंगी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भक्तिगीत गाण्यांची सादरीकरणे झाली. संध्याकाळी चार वेगवेगळ्या ठिकाणच्या भजन मंडळांनी सहभाग घेत भजनाचा कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमास कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. सुशांत नाईक, श्री. राकेश राणे, श्री. रुपेश नावेकर, श्री. मेघा सावंत, श्री. जयेश धुमाळ, श्री. आर्या राणे, वागदे सरपंच श्री. संदीप सावंत, शिर्डी संस्थानचे सदस्य श्री. विशाल कामत, बिल्डर श्री. मुरलीधर नाईक, श्री. सौरभ पारकर आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट देत शुभेच्छा दिल्या.
या वेळी साईबाबा सोशल क्लबचे अध्यक्ष श्री. मिंगेल मंतेरो व संतोष राणे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
