सोमवारी लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार माहे जानेवारी २०२६ महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी मायानाक भंडारी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे दुपारी १ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
